Popular Posts

Monday, April 25, 2011

नियतीचा नियम!!!

नियतीचा नियम आहे हा मित्रा,
काटा लागला तरी चालाव लागत,
रक्त बंबाळ होउन गेलास जरी तरी
जीवन हे जगाव लागत........

ओल्या जखमा सुखविन्यासाठी,
तुटली स्वप्न जोडण्यासाठी,
जखमांवर मीठ चोळन,स्व्प्नाचे तुकडे वेचण,
हे सारं तर करावच लागत........

अशी काय तुझी अवस्था झाली,
कि तू स्वतास हसू लागलास,
भाग्य समज मित्रा तुझ,
तू स्वतालाच ओळखु लागलास....

यम् तुला मागतोय देवाकडे,
देव हसतोय पाहून यमाकडे,
दुसरया बाजूने विचार कर मित्रा,
एवढ़ काय आहे तुझ्याकडे..........

रस्त्यावरचा कुत्रा भोकतोय,
त्याला त्याच काम करुदे,
काय विचार करतोस त्या कुत्र्याचा,
त्याचहि शेपूट वाकडच आहे........

तिच्या जाण्याने तू दुखावला आहेस,
म्हणून तू प्रेमापासून दूर आहेस,
तिला मनातून मिटवले आहेस,
मग का तिचा आता विचार करतो आहेस............

या जगात खरे प्रेम शिल्लक आहे,
नाहीतर तुझे आईवरचे प्रेम "काय" आहे?
तुझे स्वताच्या जीवनावर काय आहे?
म्ह्ननुन सांगतो या जगात खर प्रेम शिल्लक आहे

No comments: