आज तुला मनसोक्त रडायचय.............
आज तुला मनसोक्त
रडायचय,रडून घे.......
सुदैवावर कि दुर्दैवावर,
याचा विचार सोडून दे.
जवा एवढ्या सुखाने,
दुःख पर्वता तोडून दे,
नियतीच्या या अजब खेळास,
जिद्धिने जिंकुन घे.....
जवाएवढया सुखावर,
नसतो आनंद मानायचा,
दुखाला सामोरे जा,
सुख हे येतच राहत.
कमजोर कधी समजू नकोस,
तुझ्या या खंबीर मनास,
पड़ती बाजू घेण्यापेक्षा,
चिकटून रहा थोड्याश्या स्वाभिमानास.
कर्म आपले करत राहायच,
दुखाचा भागाकार होत राहतो,
शेवटी जी बाकी राहील,
त्यातच सुखाचा वाटा असतो.
एका मागुन एक दुःख आली,
म्हणून का ही तुझी अवस्था झाली,
अश्रुना गाळन्याने आता,
ती कुठे कमी झाली.
जीवन जरी दुखी असल,
दुस्र्यावरती जगणार,
तरी ते बांडगुळ नसत,
दुस्र्यावरती जगणार अन् मरणार,
तुझ जीवन तू जगत जा,
कोणावरही अवलंबुन राहू नकोस,
आतल्या आत कुढन्यापेक्षा,
रागाने तू पेठुन उठ.
देवाने देताना सुख दिल,
तितकच वाटुन दुःख दिल,
फ़क्त तुझ्या नशिबाने त्याला वाटताना,
मन थोड कंजुष केल,
भावना जर दिल्या नसत्या,
तर भावनिक होता आल नसत,
पण भावनां शिवाय असनारयाला,
मानुस म्हणन कस जमल असत......
Popular Posts
-
तूच आता ठरवून ठेव...... . जाणारा जातो खुशाल जातो.. पण आठवानितुन भासत राहतो... मनाच्या कोप-या त कुठेतरी दडलेला तो.. मैलों मैल दूर गेलेला...
-
साथ आयुष्यातील सुख दुःख हीच आयुष्याची शिदोरी... कोणासोबत तरी वाटुन बघ... नाजुक क्षणी कोणाला तरी... आपल अस मानून बघ.... साथ तर देईलच ...
-
होत अस कधी कधी......... होत अस कधी कधी......... काहीतरी लिहावस वाटताना, शब्दच सापडत नाहित, काहि गुणगुणावस वाटताना, नेमके सुरच सापडत नाहित......
-
"दुर्गवीर" च्या या कार्याने, फुलली "प्रिती" सुरगडा च्या पायथ्याशी.... "संतोष" होई त्या बालगोपाळांसी, अन...
-
हे बंध रेशमाचे................... हे बंध रेशमाचे, ना फक्त एका धाग्याचे, न तूटनारया विश्वासाचे, भाऊ बहिनिच्या नात्याचे, अस्तित्व याचे फार पुर...
-
आठवण............ आयुष्याच्या या रम्य पहाटे, आठ्वानिंचा सूर्य उगवे हा, बेधुंद होई मन माझे, तुझ्या शिवाय करमे ना. कुनासाठी तरी झुरने, हे मला प...
-
आज तुला मनसोक्त रडायचय............. आज तुला मनसोक्त रडायचय,रडून घे....... सुदैवावर कि दुर्दैवावर, याचा विचार सोडून दे. जवा एवढ्या सुखाने, दु...