Popular Posts

Saturday, June 30, 2012

जमल तर ...

जमल तर.... 


असेल खर प्रेम तीच तर बदलेल स्वतास ती, 
टिकवायच असेल तुला प्रेम तर तुही माघार घेउन बघ...

भेटन बोलन म्हणजे प्रेम नाही मित्रा,
तुही थोडा पुरुषी अहंकार बाजुला ठेवून बघ....

असेल घ्यायची परीक्षा तिच्या प्रेमाची,
तर तुही तुझ्या प्रेमाची परीक्षा देऊन बघ......

तू कितीही चुकलास तरी तुझ्या वर प्रेम करण,
हा स्त्रित्वाचा पैलू आहे....

काही झाल तरी तिने दुसर प्रेम करू नये,
हे खर पुरुषी अहंकाराच लक्षण आहे.....

असेल चुकत ती तर एकदा समजावून बघ,
जमल तर माफ़ करून बघ...

तरीही होत असतील तिच्या चूका,
तर मात्र प्रेमाची परीक्षा घेउन बघ.....

जमल तर हे अस करून बघ,
नाही मगच विसर आणि पुढे चालुन बघ...
धिरज लोके (दुर्गवीर चा धीरू)

Friday, June 29, 2012

"अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम"


मित्रानो दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित "मानगड" च्या यशस्वी आणि अविस्मरनीय "श्रमदान व गडदर्शन मोहिमे" नंतर आता दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे "अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".. दि. ८ जुलै २०१२ रोजी आपण सुद्धा सहभागी व्हा... 
संपर्क:- 
संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१ (मुंबई )Santosh Hasurkar
नितिन पाटोळे :- ८६५५८२३७४८ (मुंबई )Nitin Patole
अजित राणे :- ९७६८३८९१८९ (मुंबई)Ajit Rane
प्रीति घुले:- ८२९१८६२१३५ (मुंबई)
शैलेश कंधारे :- ९९२३४९३५०६ (पुणे)Shailesh Kandhare
जय शिवराय
दुर्गवीर प्रतिष्ठान
Durgaveer Pratishthan
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/groups/durgaveer/
https://www.facebook.com/DurgaveerPratisthan

Thursday, June 28, 2012

खरच...... जमेल का मला


खरच...... जमेल का मला

जुन्या वाईट आठवणी विसरून,
पुन्हा नव्या उमेदीने जगण,
पुर्वायुश्याच्या विश्वासघाताला विसरुन,
रागाला आवरण...
खरच...... जमेल का मला 

पहिल्या प्रेमात फसलो म्हणुन,
मैत्रिकडे संशयाने न पाहाणे,
खरच कुणाची तरी निस्वार्थी मैत्री,
त्याचा स्वार्थ म्हणुन न पाहाणे,
खरच...... जमेल का मला 

जबाबदारीमूळे प्रेमात फसण,
अनं त्या प्रेमात फसन्याने,
स्वताला जबाबदारित गुंतवण, 
आता तरी या चक्राला थांबवन,
खरच...... जमेल का मला 

आठवन येते पहिल्या प्रेमाची,
आशा आहे "ती" परतण्याची,
राखून ठेवलीय मी जागा तिची,
सहजा सहजी ना होणार ती "जागा" दुस-या कुणाची,
खरच...... जमेल का मला

रात्री अपरात्री "ती"ला आठवण,
प्रत्येक मुलीत "ती" ला शोधण,
भले ती कुठेतरी कमी पडण,
पण निदान तिला ख-या मैत्रीत टिकवण,
खरच...... जमेल का मला    
३०/११/२००८ 
सका. ३:०५

तोच...



तोच


तोच पाउस पण त्याचा नूर निराला
त्याच भावना पण समजुन घेणारा वेगला
तोच सागर उधानलेला,
आठवनित व्याकुळलेला

त्याच विजेच्या रितीने 
कडाडलेल्या भावना..
तोफांपरी मनात 
धडाडलेल्या भावना

पाणावलेल्या  त्या नयनाच्या कडा
दुसर होई श्रावण सडा
घेई श्वास हे मन
जानत असे कोणी मनकवडा...

शिवदुर्ग "अवचीतगड" श्रमदान मोहीम दि. ८ जुलै २०१२ (Avachitgad Shramdan Mohim Dated 8th July 2012 )




दुर्गविर प्रतिष्ठान तर्फे आयोजीत शिवदुर्ग "अवचीतगड" श्रमदान मोहीम(Avachitgad Shramdan Mohim )

जय शिवराय
मित्रानो दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित "मानगड" च्या यशस्वी आणि अविस्मरनीय "श्रमदान मोहिमे" नंतर आता दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे "अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".. दि. ८ जुलै २०१२ रोजी आयोजित करण्यात येत आहे आपण सुद्धा या शिव्कार्यात सहभागी व्हा...

दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते.
घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. याच दरवाज्या समोर एका कोपर्यात शिलालेख ,,,आहे त्या शिलालेखात अवचितगडाचा इतिहास असावा ....गडावर महादेवाचे सुंदर मानादीर आहे ..त्याच मंदिरा समोर ...लोहगडाच्या हत्ती तलावासारखा बारा कोणी......तलाव आहे .... दुसर्‍या दरवाजात पाण्याने तुडुंब भरलेला तलाव आहे.टाळावा जवळच बाजी पासलकर यांची पाषाणातील मूर्ती आहे.पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते...
दुर्गविर तर्फे मागील महिन्यात महाराष्ट्र दिन याच गडावर करण्यात आला होता .
गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती ,सुधागड,सरसगड,धनगड,कोरीगड,रायगड,सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो


कोणी किती किल्ले पाहिले हे महत्वाचे नसून ,,त्या गड्कील्यांसाठी आपण काय केले हे महत्वाचे ,दुर्गवीर प्रतिष्ठानाचे प्रत्येक मावळा ''श्रमदान हेच शिवकार्य '' हा मंत्र मनात ठेऊन शिवकार्य करत असत..............
श्रमदान फक्त राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या गड्कील्ल्यांसाठी........
श्रमदान फक्त इतिहासाची जान करून देण्यासाठी............................
श्रमदान फक्त येणाऱ्या असंख्य पीडिला आपले राजे काय होते हे समजण्यासाठी...........
श्रमदान फक्त शंभूराजांच्या बलिदानाची जान असण्यासाठी.................
आम्हा दुर्गवीराना अनेक शिवप्रेमी विचारणी करतात कि..
तुह्मी हे श्रमदान का व कशासाठी करतात...... ??
त्यांचे उत्तर या शिवकार्यतून दिसून येईलच.....
तरी हि सांगतो .......
ज्यांच्या जोरावर शिवरायानी , स्वराजांचे देखणे स्वप्न साकार केले, ते हेच गडकोट आज किती
भग्नंअवस्थेत आहेत......
त्याच गडकोटांचे अस्थित्व टिकविण्यासाठी हे श्रमदान.......

या या शिवरायाच्या मावळ्यानो सामील व्हा ......................
या शिवकार्यात..

करून तर पहा हे शिवकार्या ,काय आनद मिळतो ते...
या हे गडकोट आवाज देत आहे.....''''जागे करा पुन्हा आम्हाला''''' मग येणार का ........
फक्त एक दिवस या गडकोटांच्या अस्थित्वासाठी
या पुढे देखील हे शिवकार्य अजून जोमाने करू....तुम्हा सर्व मावळ्यांचा सहकार्याने हा इतिहास ज्वलंत आणि जिवंत ठेऊ आणि स्वराज्याच्या गड-बुरुजाला मुला सकट जागे करू व त्यांना आधार देऊ...
त्यातून मिळणारे समाधान...
हाच कदाचित राजांना मानाचा मुजरा असेल.
स्वराज्याच्या गडकिल्याबद्दलची निष्ठा आणि तुमचा या शिवकार्याला लागलेला हातभार ....
हेच आमचे पाठबळ.

तुम्हाला या शिवकार्या सहभाग घेयावायचा असेल तर नक्की संपर्क करा....

संतोष असुरकर (मुंबई)
9833458151
नितीन पाटोळे (मुंबई)
08655823748
अजित राणे (मुंबई)
09768389189
प्रीति घुले:- 8291862135 (मुंबई)
शैलेश कंधारे :-9923493506 (पुणे)
जय शिवराय...!!

मुंबई वरून येणर्या शिवभक्तानी ....दि ७/७/१२/ ला दिवा रेल्वे स्टेशन जवळ ६.१५ पर्यंत पोहचावे....
आपण सर्वे रात्री १०.३० पर्यंत अवचितगडाच्या पायथ्याशी पोहचू .......
निढी गावातील विठ्ठलाच्या मंदिरात आपल्या राहण्यची सोय केलेली आहे
रात्र भर आराम करून पाहते ७ पर्यंत गड सरकरायला सुरवात करू .....
श्रमदान व गडफेरी झाल्यावर दुपारी २.०० गड उतरण्यास सुरवात करू........

NOTE ....
१ दिलेल्या वेळेत दिवा रेल्वे स्थानका जवळ भेटावे....
३ सकाळचा नाश्ता , चहा , दुपारचे जेवण,आणि दुपारचा चहा व नाश्ता दुर्गविर तर्फे
देण्यात येईल
४ प्रवेश शुल्क....२००/..200rs ......
५ अधिक माहितीसाठी संपर्क करा

अजित राणे ९७६८३८९१८९ ,
नितीन पाटोळे ८६५५८२३७४८

................,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,सर्व अधिकार दुर्गविर प्रतिष्ठान ...........................

Tuesday, June 26, 2012

"अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".




मित्रानो दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित "मानगड" च्या यशस्वी आणि अविस्मरनीय "श्रमदान व गडदर्शन मोहिमे" नंतर आता दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे "अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".. दि. ८ जुलै २०१२ रोजी आपण सुद्धा सहभागी व्हा...
संपर्क:-
संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१ (मुंबई ) Santosh Hasurkar
नितिन पाटोळे :- ८६५५८२३७४८ (मुंबई ) Nitin Patole
अजित राणे :- ९७६८३८९१८९ (मुंबई) Ajit Rane
प्रीति घुले:- ८२९१८६२१३५ (मुंबई)
शैलेश कंधारे :- ९९२३४९३५०६ (पुणे) Shailesh Kandhare
जय शिवराय
दुर्गवीर प्रतिष्ठान
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/groups/durgaveer/
https://www.facebook.com/DurgaveerPratisthan
 

Saturday, June 23, 2012

तूच आता ठरवून ठेव.

 तूच आता ठरवून ठेव.......
जाणारा जातो खुशाल जातो.. 
पण आठवानितुन भासत राहतो...
मनाच्या कोप-या त कुठेतरी दडलेला तो..
मैलों मैल दूर गेलेला असतो....
चटकन जसा गेला तो...

तशी आठवन त्याची जाणार नाही....
त्याच्या आठवनित वाहिलेल्या त्या..
अश्रूंचा हिशेब काही लागणार नाही.....
त्याच्या आठवनित वाहिलेल्या जगाचा..
पंचनामा तरी कशाला करतेस...
तुझपाशी आहे तुझे आयुष्य..
त्याच्या कड़े कशाला मागतेस....
सुरां विना त्याच्या गीत तुझे बिघडवू  नकोस...
शब्दाविना त्याच्या काव्य तुझे हरवू नकोस....
त्याच्या ठरवीन्याने काय होते..
माघार नाही आता हे तूच आता ठरवून ठेव..

धिरज "धिरु" लोके 

जमेल तुला .....

जमेल तुला .....
जमेल तुला पण त्याच्याशी न बोलता रहायला,
जमेल तुला त्याच्या काळजी शिवाय मान रमवायला.....
जाशील तू त्याच्या पासून खुप दूर...
होशील तू मुक्त श्वासातिल त्याच्या आठवनी पासून...
फ़क्त मन गुंतव अश्या जगात,
नसेल जिथे त्याच्या आठवनिंचा आघात.......धिरज "धिरु" लोके   

मानाचा गड... मानगड



शब्दांकन नितिन पाटोळे  

"किल्ले मानगड" श्रमदान मोहीम 


दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित किल्ले मानगड श्रमदान मोहीम 

किल्ले रायगड हा भारतीय इतिहासातील मानबिंदू. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा मानबिंदू. हा किल्ला माहित नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. पण, ज्या प्रमाणे राजाला अंगरक्षक असतात त्या प्रमाणे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला सात अंगरक्षक आहेत. या परिसराला 'प्रभावळी' असे म्हटले जाते. त्यातीलच एक संरक्षक किल्ला आहे किल्ले मानगड! 

महाराष्ट्रातील अनेक उपेक्षित किल्ल्यान पैकी एक. दुर्लक्षित. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने या किल्ले रायगडच्या पहारेकऱ्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक गावातील सरपंच व गावकऱ्याच्या मदतीने किल्ल्या वरील मुख्य प्रवेशदरवाजातील मांडणी आणि एका जुन्या दरवाजातील उत्खनन श्रमदान राबविण्यात आलेले आहे..... 

मानाचा गड म्हणून या किल्ल्याला मानगड असा उल्लेख होतो .. ... 

गडावर ठिकठिकाणी अस्वच्छता झाली होती. ती सुद्धा दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी साफ सफाई करण्यात आली. 
मुख्य म्हणजे मानगडाच्या शेवटच्या बुरुजावरील एक भला मोठाला विशिष्ट आकाराचा दगड पाहून संतोष (प्रमुख) ने आपल्या श्रमदानाच्या अनुभवावरून व ऐतिहासिक अभ्य्सानुसार त्या तिथे नक्कीच काही असणार याचा निष्कर्ष लावला ,ठरल्या प्रमाणे संतोष ने char प्रकारात विभागणी केली .. 

ती अशी 
१) महादरवाजा 
२) शेवटचा बुरुज 
३) शालेय वस्तूचे वाटप 
४) माहिती फलक 

पुण्याहून आलेले आमचे थोरले बंधू शैलेश कंदारे व त्यांच्या सहकार्यांनी महादरवाजा जी जबाबदारी घेतली ........ 

महिला मंडळ शालेय वस्तूंचे वाटप करण्यास सज्ज झाले .............
तशी आमची गीतू ताई आमच्या सोबतच होती ...... 
मी मात्र माझ्या (दुर्गविर) बंधू सोबत बुरजावर गेलो........... 
मग काय श्रमदान सुरु पावसाच्या आगमनाने या वेळची मोहीम अविस्मरणीय झाली .. 

या श्रमदानात २५० ते ३०० वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा उत्खनन करून तो संपूर्णपणे ६ ते ७ शिवकाळातील पायऱ्या दिसतील अश्या प्रकारचे श्रमदान करण्यात आले.त्या दरवाजावरील मातीचा ढिगारा आणि दगड काढण्यात आले. या पुढे त्या गडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांना त्या शिवकाळातील तो दरवाजा आता संपूर्णपणे बघू शकतो अश्या पद्धतीने श्रमदान करण्यात आले... 

या मोहिमेला मुंबई व ठाणे परिसरातील अनेक शिवप्रेमी व दुर्गप्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला असून, श्रमदान करून आपली उज्ज्वल संस्कृती असलेल्या गड किल्ल्याच्या संवर्धनात मोलाची कामगिरी बजावली आहे. 

मुख्य म्हणजे ६ तरुणी आणि ३६ तरुण असा दुर्गवीर परिवारातील मावळ्यांनी हे श्रमदानाचे संयोजन राबविण्यात आले. गडाच्या पायथ्याशी असलेले माशिदवाडी उर्फ (मानवाडी) येथील ग्रामस्थ रामजी कदम यांनी सुद्धा दुर्गवीरच्या सर्व मावळ्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजून जी मदत केली ती त्या मदतीला शब्द सुद्धा कमी पडतील असे आहे......... 

या अश्या शिवकार्यात आपल्यालाही सहभाग घेयचा असेन तर नक्कीच कळवा....... 
आपलाच मित्र नितीन पाटोळे शब्दांकन नितिन पाटोळे 

जय जिजाऊ l
जय शिवराय ll
जय शंभूराय ll

Friday, June 22, 2012

संभाजी महाराजांची विद्वत्ता



संभाजी महाराजांची विद्वत्ता 
एक ग्रंथ जो गागाभट्टनी लिहिला होता त्या ग्रंथाचं नाव आहे
'समनयन'.त्या ग्रंथाच्या पहिल्या पानावरती जे समर्पन
आहे त्यात असं लिहिलं आहे,'ज्याच्या पराक्रमाने दाही दिशा तळपतात
अश्या शंभू राजांच्या त्या पवित्रविचारांना समर्पित.'
संभाजी महाराजांची विद्वत्ता काय आहे हे
गागाभट्ट त्यांच्या प्रस्तावन्या मध्ये लिहितात.
संभाजी महाराजांनी स्वत: ४ ग्रंथ लिहिले हे तर आपल्याला माहिती आहे.
वया च्या १४ व्या वर्षी पहिला ग्रंथ लिहायला सुरवात केली आणी २०
व्या वर्षी पुर्ण केला लो म्हणजे 'बुद्धभुषण'. भल्या भल्या पंडितांना तोंडात बोट
घालायला लागतील असा तो बुद्धभुषण ग्रंथ आहे.
त्यातलं एक वाक्य असं आहे की बांबुच्या झाडाला शंभर वर्षा नंतर फुलं येतात
आणी फुलं आल्या नंतर ते झाड मरत असतं. याचा अर्थ असा की संभाजी महाराज फक्त
साहित्यिक नव्हते तर इतर व्याव्हारिक न्यान
हवं ते सुद्धा भरपूर होतं. संभाजी महाराजांनी आणखी ३ ग्रंथ लिहिले
वयाच्या ३० व्या वर्षा पर्यंत.'नखशिख'
'सातसतक' आणि 'नाइकाभेद'.
नाइकाभेद मध्ये न्रूत्याचे प्रकार किती असतात हे लिहिलं आहे.
आज जे आपण भरतनाट्यम पाहतो ते भरतनाट्यम नाइकाभेद वरती आधारित आहे.
भरतनाट्यम या न्रूत्य प्रकाराचे जनक संभाजी महाराज आहे याचा पुरावा नाइकाभेद
मध्ये सापडतो. नाइकाभेद हे संभाजी महाराजांनी लिहिलेल दुसरं ग्रंथ.
तिसरं ग्रंथ आहे नखशिख. नखा पासनं तर शिखा पर्यंत म्हणजे
पायाच्या नखा पासन तर शिखा पर्यंत म्हणजे डोक्या पर्यंत शरिराचं आरोग्य शास्त्र काय आहे.
का तुम्ही आजाकी पडता आणी कसं तुम्ही नीट
होऊ शकता याचा सखोल अभ्यास या ग्रंथात आहे. याचा अर्थ हा की संभाजी महाराज हे Doctor
सुद्धा होते. हा ग्रंथ शैल्य चिकित्सेवरती आधारित आहे. आणखी काय उधारण द्यायचं
संभाजी महाराजांच्या विद्वत्तेचं? संभाजी महाराजांचा शेवटचा ग्रंथ आहे सातसतक.
राजानी राज्य करतांना प्रजेला आपलं कुटुंब समजुन राज्य करायचं. मी त्या राज्याचा मालक
नाही तर सेवक आहे ही भुमीता घेऊन राज्य केलं पाहिजे.
छत्रपती संभाजी हे चक्रवती संन्यासी आहे याचा पुरावा या ग्रंथात भेटतो.
त्यांनी आपल्या आयुष्यात तो प्रयोग करुन पाहिला.
वयाच्या ३० व्या वर्षी जेव्हा लोकांना मौज- मजा करण्याची हौस असते त्या वेळी अद्यात्म
म्हणजे काय. संन्यास कसा घ्यावा. विर्स्त जीवन कसं जगावं याच्या वर
संभाजी महाराजांनी सातसतक हा ग्रंथ लिहिला. विषेश म्हणजे पहिला ग्रंथ बुद्धभूषन हा संस्क्रुत
मधे आहे आणी बाकीचे ३ ग्रंथ हे भोजपुरी भाषेत आहे.
आणखी काय
पुरावा द्यायचा माझ्या संभाजी महाराजांच्या गुणांचा?
सर्व गुण संपन्न जे म्हणतात ते आहे माझे

Wednesday, June 20, 2012

साथ


साथ  
आयुष्यातील सुख दुःख हीच आयुष्याची शिदोरी... 
कोणासोबत तरी वाटुन बघ...
नाजुक क्षणी कोणाला तरी...
आपल अस मानून बघ....
साथ तर देईलच तुझ धैर्य...
पण कुणा आपल्याचा धीर देणं समजुन बघ...  

Tuesday, June 19, 2012

मानगड श्रमदान मोहीम दिनांक १७/६/२०१२


मानगड श्रमदान मोहीम
दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने राबविण्यातआलले दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत "किल्ले मानगड" वरील मुख्य प्रवेशदरवाजातील मांडणी आणि एका जुन्या दरवाजातील उत्खनन श्रमदान राबविण्यात आलेले आहे.
त्याच साफ - सफाई न करण्यात आल्याने "किल्ले मानगड'' ठिकठिकाणी अस्वच्छता झाली होती. ती सुद्धा दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी साफ सफाई करण्यात आली. मुख्य म्हणजे मानगडाच्या शेवटच्या बुरुजावरील २५० ते ३०० वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा उत्खनन करून तो संपूर्णपणे ६ ते ७ शिवकाळातील पायऱ्या दिसतील अश्या अवस्थेत ते श्रमदान करण्यात आले.
त्या दरवाजावरील मातीचा ढिगारा आणि दगड काढण्यात आले. या पुढे त्या गडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांना त्या शिवकाळातील तो दरवाजा आता संपूर्णपणे बघू शकतो अश्या पद्धतीने श्रमदान करण्यात आले.
 —

Monday, June 18, 2012

माझी मानगड श्रमदान मोहीम दुर्गवीर सोबत...





मानगड श्रमदान मोहीम
दिनांक १७/६/२०१२ रोजी दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई च्या वतीने राबविण्यात आलेल्या दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत "किल्ले मानगड" वर दुर्ग दर्शन, श्रमदान व आदिवासी वस्तीत शालेय वस्तू वाटप करण्यात आले.
दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई व पुणे च्या वतीने सुमारे ३५-४० दुर्गवीरांच्या मदतीने किल्ले मानगड वर श्रमदान करण्यात आले. सदर श्रमदाना च्या वेळी किल्ल्याच्या मागच्या बाजुला एक शिवकालीन चोर दरवाजा मिळाला त्याच्या ६-७ पाय-या स्पष्ट दिसतील अश्या पद्धतिने स्वच्छ करण्यात आल्या. कालानुरूप त्या पूर्णपणे जमिनीत गाडलेल्या होत्या. श्रमदाना सोबत गडाच्या पायथ्याशी असलेल्या आदिवासी पाड्यात गरीब मूलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. सदर मोहिमेत मुंबई सोबत पुणे च्या दुर्गवीरांनी विशेष मेहनत घेतली.
श्रमदाना नंतर दुर्गवीर चे अध्यक्ष संतोष हसुरकर यांच्या कडून सर्व दुर्गवीरांचे आभार मानण्यात आले व यापुढच्या प्रत्येक मोहिमेत असेच सहकार्य देऊन जास्तीत जास्त जणांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले..
संपर्क:-
संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१ (मुंबई )
नितिन पाटोळे :- ८६५५८२३७४८ (मुंबई )
प्रीति घुले:- ८२९१८६२१३५ (मुंबई)
शैलेश कंधारे :- ९९२३४९३५०६ (पुणे)
Durgaveer Pratishthan...
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/groups/durgaveer/

Wednesday, June 13, 2012

रायगड - एक वेध !

रायगड - एक वेध !

अक्षांस रेखांश
समुद्रसपाटीपासून उंची
रायगडाची नांवे
रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
रायगडाच्या घेऱ्यातील मेटे
रायगडाच्या घेऱ्यातील गावे
रायगडावरील तोफांची नावे
रायगडाचे अठरा कारखाने
रायगडाचे बारा महाल
राजाभिषेक
राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ
रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी
महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी
रायगड शकावली

१) सध्याच्या रायगड जिल्ह्यात अक्षांस १८०, १४ व रेखांश ७३०, २० वर

२) समुद्रसपाटीपासून उंची - २८५१ फुट

३) रायगडाची इतिहासाला ज्ञात असलेली नांवे -
१) रायरी २) रायगिरी ३) जंबुद्विप ४) राजगिरी ५) तणस ६) राशिवटा ७) नंदादिप
८) बंदेनूर ९) भिवेगड १०) रेड्डी ११) राहिर १२) शिवलंका १३) रायगड
१४) इस्लामगड १५) इंग्रजांनी कौतुकाने दिलेले नाव पूर्वेकडील जिब्राल्टर

४) रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
१) महाद्वाराचा खळगा २) टकमकीचा खळगा ३) टकमक पहारा
४) निवडुंगाचा खळगा ५) सातविणीचा खळगा ६) माडाचा खळगा
७) काळया हौदाचा खळगा ८) लिंगाण्याचा पहारा ९) भवानीचा खळगा
१०) वाघदऱ्याचा पहारा ११) बाराटाकीचा खळगा १२) कोंडेख्रळीचा खळगा
१३) काळकाईचा खळगा १४) हिरकणीचा पहारा

अ) या व्यतिरिक्त इतरस्त्र पहारा -
१५) चौकी फडाची १६) चित्ते दरवाजा १७) धोंडीचा पहारा १८) वाघदऱ्याखालील पहारा
१९) धारबीडचा पहारा २०) कळकीचा पहारा २१) खुबलढा बुरुज २२) लहाना दरवाजा
२३) उंबराची सदर २४) नाडालीचा पहारा २५) तळाचा पहारा २६) टोकाचा पहारा
२७) माथ्यावरील सदरेचा पहारा २८) बाराटाकीचा पहारा २९) धामणदऱ्याचा पहारा
३०) नांदगिरीचा पहारा ३१) केळीचा पहारा ३२) तटबंदी हिरकणीची सदर
३३) लिंगाचा पहारा ३४) गोलंदाजाचा पहारा ३५) चिलखताचा पहारा

५) रायगडाच्या घेऱ्यातील मेटे -
१) कोठिनजीकचे मेट २) म्हशाचे मेट ३) चोखडीचे मेट ४) चाहुटीचे मेट
५) जांभळीचे मेट ६) निसणीचे मेट ७) सावताचे मेट ८) आंब्याचे मेट
९) तोफेचे मेट १०) डयूब्याचे मेट

६) रायगडाच्या घेऱ्यातील गावे -
१) मौजे वाळूसरे २) वाघोली ३) वाडी ४) वाघेरी ५) वारंगी ६) छत्री निजामपूर
७) बावले ८) सांदोशी ९) आमडोशी १०) कावले ११) करमर १२) खलई
१३) पुनाडे १४) सारवट १५) नेराव १६) पाचाड १७) कोंझर १८) मांगरुण
१९) देवघर २०) नाते

७) रायगडावरील तोफांची नावे -
१) तोफ गंगासागर २) तोफ मुलना ३) तोफ पेरूजंगी ४) तोफ भुजंग ५) तोफ रामचंगी
६) तोफ पद्मीण ७) तोफ फतेलष्कर ८) तोफ फतेजं ग ९) तोफ सुंदर १०) तोफ रेकम
११) तोफ मुंगसी १२) तोफ शिवप्रसाद १३) तोफ गणेश १४) तोफ लांडा कसाब
१५) तोफ चांदणी १६) तोफ भवानी १७) तोफ नागीण

८) रायगडाचे अठरा कारखाने (कंसातील प्रतिशब्द राज्यव्यवहार कोशांतील आहेत)
१) खजीना (कोशागारं खजाना स्यात्) २) जव्हाहीरखाना (रत्नशाला)
३) आंबारखाना (धान्यकोश) ४) आबादारखाना (जलस्थान)
५) नगारखाना (नौबतखाना) ६) तालीमखाना (व्यायामशाला)
७) जमादारखाना (वसनागर ८) जिरातेखाना (शास्त्रगार)
९) मुदबखखाना (पाकालय) १०) शरबतखाना (पानकादिरसस्थानं)
११) शिकारखाना (पक्षिशाला) १२) शहतखाना (आरोग्यगृह)
१३) पीलखाना (हत्तीशाला) १४) फरासखाना (राहुटया, डेरे, पाल वगेैरे ठेवण्याची जागा)
१५) उष्टरखाना (उंटशाला) १६) तोफखाना
१७) दफ्तरखाना (लेखशाला) १८) दारुखाना (अग्नस्त्रगृह)

इत्यादी मात्र महाराजांच्या कारखान्यांपैकी दारुखाना हा मोगलांच्या अठरा कारखान्यांपैकी नसून पोर्तुगीज ‘Cada De Palbora’ याच्या धर्तीवर काढला होता.

९) रायगडाचे बारा महाल -
१) पोते (कोषागार) २) टंकसाळ ३) थट्टी (गोशाला)
४) दरूनी (अंत:पूर) ५) सेरी (तृप्ति समाधान) ६) पागा (अश्वशाला)
७) वहिली (रथशाला) ८) इमारत (बांधकाम) ९) कोठी (धान्यकोठार)
१०) पालखी (शिबिका) ११) सौदागरी (व्यापारी) १२) छबीना (रात्रिरक्षणम्)

१०) राजाभिषेक (पहिला) - ६ जून शनिवार अष्टमदिन पहाटे महाराज सुर्योदयापुर्वी तास सव्वा तास ज्या वेळेला गर्गाचार्याचा मुहुर्त म्हणून संबोधतात त्या वेळेस सिंहासनारोहण विधी झाला. ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार घटी २१ पळे ३४ विष्कंम ३८-४० सी ४२ तीन घटीका रात्र ठरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले - पौरोहीत्य
गागाभट्ट
राजाभिषेक (दुसरा) हा राजाभिषेक कुंभ लग्नावर, आयुष्यमन, योग असताना, अनुराधा नक्षत्र बुधवार, आश्विन शु॥ ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी झाला. - पौरोहित्य निश्चलपुरी.

११) राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ (कंसातील प्रतिशब्द राजाभिषेकापुर्वीचे फार्सी शब्द आहेत)

सिंहासनाच्या डावीकडे -
१) हंबीरराव मोहिते - सेनापती (सर-ए-नौबत)
२) रामचंद्र त्रिंबक - सुमंत (दबीर)
३) निराजी रावजी - न्यायाधीश (काजी-उल-कुजात)
४) मोरेश्वर रघुनाथ - पंडितराव उर्फ दनाध्यक्ष - (सद्र - मुहतसिब)

सिंहासनाच्या उजवीकडे -
१) मोरोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवा)
२) रामचंद्र निळकंठ - अमात्य (मजमुअदार)
३) अण्णाजी दत्तो - सचिव (शुरु - नवीस)
४) दत्ताजी त्रिबंक - मंत्री (वाकिया - नवीस)

१२) महाराजांच्या महानिर्याणानंतर संभाजी राजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा अधिकाऱ्यांकडून मागवलेली व स्वत:जातीने तपासणी केलेली रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी -
सोने ९ खंडी, होन ५ लक्ष, तांबे ३ खंडी, शिसे ४५० खंडी, लोखंड २० खंडी,
जस्त व शिसे यांची मिश्र धातू ४०० खंडी, चांदी ५॥ खंडी, ब्राँझ २७२ खंडी,
निरनिराळया अधिकाऱ्यांकडे ३ लक्ष होन, निरनिराळया गडांवर ३० लक्ष होन,
भात १७ हजार खंडी, तेल ७० हजार खंडी, सौंधव २७० खंडी, जिरे २०० खंडी,
गोपीचंदन २०० खंडी , गंधक २०० खंडी, कापडाची ४ हजार पांढरी ठाणे,
हलक्या कापडाचे ३ हजार ठाणे, बुऱ्हाणपुरी कापडाचे १ हजार ठाणे,
पैठणी कापडाचे ४ हजार ठाणी, धान्य, डाळी, तंबाखू साखर मोठया प्रमाणात होत्या,
नऊ कोट रुपयांची सोन्याची नाणी, ५१ हजार तोळे सोने, २०० तोळे माणके,
१ हजार तोळे मोत्ये, ५०० तोळे हिरे, ४० हजार डर्कस, ३० हजार तलवारी,
४० हजार भाले, ६० हजार लाँगडर्कस, ५० हजार दुधारी तलवारी,
६० हजार ढाली, ४० हजार धनुष्य, १८ लक्ष बाण
इत्यादी संपत्ती त्यावेळी रायगडावर होती.

१३) महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी -
हेन्री ऑक्झेंड्न हा इंग्रजांचा वकिल सुरतेच्या प्रसिडेंट जॉर्ज ऑक्झेंडनचा नातलग कारवारच्या वखारीचा प्रमुख होता. महाराजांनी कारवार जिंकले तेव्हांचा हा परिचय हाच हेन्री ऑक्झेंडन रायगडावर राज्याभिषेकाच्यावेळी हजर होता. त्याच्या बरोबर जॉर्ज रॉबिन्सन, थॉमस मिचेल, आणि नारायण शेणवी हा दुभाषा आले होते. पुढे सन १६७५ मध्ये सॅम्युअल ऑस्टीन हा वकिल महाराजांच्या दरबारी आढळतो. सन १६७६ मध्ये मौलवेअरने रायगडास इंग्रजांतर्फे वकिली करण्यास भेट दिली. संभाजी राजांच्या आमदानीत कॅप्टन गेरी व लेफ्टनंट विल्किन्स आणि नंतर बहूधा केग्विन याने रायगडाला भेट दिली. केनेडी, डग्लस, मेजर हॉल, कर्नल प्रॉथर, लेफ्टनंट क्रॉसबी, लेफ्टनंट रेमन, एन्साइन्स जॅप, डॅशवूड, मेजर बाँन्ड या इंग्रजांनी रायगडास भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो, हेन्री रेव्ंहिगटन तर शिवकालात कैदी म्हणून वास्तव्यास होता. पोर्तुगीज वकिल गोंझालो मार्टिन आणि डच वकिल अब्राहम लेपेकर यांच्या रायगडवारी बद्दल माहिती उपलब्ध असून मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यू, कमिशनर क्रॉफर्ड कॅप्टन पिट, जेम्स डग्लस या मंडळीच्या भेटी तर उल्लेखनीय आहेत.

१४) रायगड शकावली -
११ वे शतक - यादवांची सत्ता गडावर मराठे पाळेगार.
१२ वे शतक - मराठे पाळेगारांनी विजयनगर अथवा. अनागोंदीचे स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४३६ - अल्लाउद्दीन शहा बहामनी २रा याचे मराठे पाळेगारांनी स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४७९ - अहमद नगरच्या निजामशहाकडे गड ताब्यात शिर्के येथील देशमुख.
इ.स. १५५८ - अदिलशहाची अधिसत्ता.
इ.स. १६१७ - निजामशाही अधिकारी म्हणून आागा हाजी याकुद इस्तंबोली हा हवालदार.
इ.स. १६१८ - आदिलशाहीच्यावतीने हैबतखानाचा रायरीवर हल्ला, लुट व सबंध खोरे काबीज, हवालदारी राजे पतंगराव याजकडे.
इ.स. १६२१ - राजे पतंगराव यांची बदली होवुन मलिक जमरुत गडाचा हवालदार.
इ.स. १६२४ - निजामशाही अधिकारी म्हणून इब्राहिमखान हा रायरीचा व बारा मावळांचा हवालदार.
६ मे १६३६ - बादशहा शहाजहान याची निजामशाहीवर स्वारी व विजय, मोगल राजधानी पासून दुर असलेला हा अवघड मुलूख सांभाळणे कठीण म्हणून अदिल शहाशी तह. रायरीचा प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोऱ्यांकडे.
६ मे १६५६ - शिवरायांनी रायरी जिंकला.
४ सप्टेंबर १६५६ - रायरी हे नांव बदलू रायगड हे नामकरण.
इ.स. १६५७-५८ - आबाजी सोनदेव व रामराव प्रभू यांची नेमणूक
११ डिसेंबर १६६७ - पोर्तुगीज वकील गोंझालो मार्टिनशी वाटाघाटी.
इ.स. १६७० - गडाची दुरुस्ती, व नवीन बांधकाम महाराजांचे कायमस्वरुपी वास्तव्य.
मे १६७२ - इंग्रज वकील उस्टिक रायगडावर.
२१ जुलै १६७२ - डच वकील आब्राहम लेपेकर रायगडावर.
३ जून १६७३ - इंग्रज वकील थॉमस निकल्स रायगडावर.
२२ मे १६७४ - हेन्री ऑक्झेंडनचे आगमन व १३ जुन पर्यंत मुक्काम
२९ मे १६७४ - महाराजांची समंत्रक मुंज.
३० मे १६७४ - सोयराबाई साहेबांशी समंत्रक विवाह.
६ जून १६७४ - जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेक.
१७ जून १६७४ - राजमाता जिजाऊसाहेबांचे पाचाड येथे निधन.
२४ सप्टेंबर १६७४ - अश्विन शु. ५ (ललितापचंमी) दुसरा राज्याभिषेक
२४ सप्टेंबर १६७५ - इंग्रजवकील सॅम्युअल ऑस्टिन गडावर.
७ सप्टेंबर १६७५ - राजाराम साहेबांची मुंज.
१५ मार्च १६८० - राजाराम साहेबांचे लग्न.
३ एप्रिल १६८० - महाराजांचे महाप्रस्थान.
२१ एप्रिल १६८० - राजाराम साहेबांचे मंचकारोहण.
१८ जून १६८० - संभाजी राजांचे पन्हाळयाहून आगमन.
२७ जून १६८० - शिवपत्नी पुतळाबाई साहेब सती.
२० जुलै १६८० - संभाजी राजांचे मंचकारोहण.
२७ ऑक्टोबर १६८० - मोरोपंत पिंगळे यांचे देहावसन.
१६ फेब्रुवारी १६८१ - संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक.
ऑगस्ट १६८१ - संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न.
९ फेब्रुवारी १६८१ - राजाराम महाराजांचे मंचकारोहण.
२५ मार्च १६८९ - झुल्फिकार खानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९ - राजाराम महाराज रायगडावरुन निसटले.
३ नोव्हेंबर १६८९ - गड मोगल्यांच्या हाती - इस्लामाबाद नामकरण.
इ.स. १६९० - मोगलांतर्फे गडाचा ताबा सिद्दीकडे.
६ जून १७३३ - रायगड पेशव्यांनी घेतला, ताबा पंतप्रतिनिधींकडे.
१८ मार्च १७७३ - रायगड पेशव्यांच्या ताब्यात.
जून १७९६ - नाना फडणविसांचा मुक्काम व गडाची डागडुजी.
इ.स. १८०२ - दुसऱ्या बाजीरावाचे गडावर वास्तव्य.
२ फेब्रुवारी १८१० - रायगड-माची येथे दुसऱ्या बाजीरावाचा मुक्काम.
इ.स. १८१६ - रायगड इंग्रजांकडे परंतु लगेच त्याचा ताबा पेशव्यांकडे, पेशवे गड सोडिनाच.
२५ एप्रिल १८१८ - इंग्रजांचा रायगडाला वेढा.
४ मे १८१८ - खुब लढयावर इंग्रजांचा भडिमार.
६ मे १८१८ - पोटल्याच्या डोंगराकडून केलेल्या भडिमाराने गडावर जाळपोळ.
१० मे १८१८ - रायगडावरील स्वातंत्र्यसुर्य मावळला तह होवुन गड इंग्रजांकडे. संग्रहित माहिती...

ADhiRAJ Lokedhirajloke.blogspot.com
www.facebook.com/dhiraj.loke
twitter.com/dhiraj100loke
dhirajloke.webs.comhttps://profiles.google.com/110331284163797351089
 




Tuesday, June 12, 2012

माझे दुर्गवीर सोबत श्रमदान आणि श्रमदानासोबत समाजकार्य.....


"दुर्गवीर" च्या या कार्याने, 

फुलली "प्रिती" सुरगडा च्या पायथ्याशी....
"संतोष" होई त्या बालगोपाळांसी,
अन प्रज्वल होई ज्योत शिवकार्याची.....
साथ असे आम्हा अनिकेत बंधुंची,
जणू चंद्रूस साथ अग"निति न" असंख्य ता-यांची...
जय शिवराय...
धिरज लोके
Durgaveer Pratishthan