रायगड - एक वेध !
अक्षांस रेखांश
समुद्रसपाटीपासून उंची
रायगडाची नांवे
रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
रायगडाच्या घेऱ्यातील मेटे
रायगडाच्या घेऱ्यातील गावे
रायगडावरील तोफांची नावे
रायगडाचे अठरा कारखाने
रायगडाचे बारा महाल
राजाभिषेक
राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ
रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी
महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी
रायगड शकावली
१) सध्याच्या रायगड जिल्ह्यात अक्षांस १८०, १४ व रेखांश ७३०, २० वर
२) समुद्रसपाटीपासून उंची - २८५१ फुट
३) रायगडाची इतिहासाला ज्ञात असलेली नांवे -
१) रायरी २) रायगिरी ३) जंबुद्विप ४) राजगिरी ५) तणस ६) राशिवटा ७) नंदादिप
८) बंदेनूर ९) भिवेगड १०) रेड्डी ११) राहिर १२) शिवलंका १३) रायगड
१४) इस्लामगड १५) इंग्रजांनी कौतुकाने दिलेले नाव पूर्वेकडील जिब्राल्टर
४) रायगडावरील खळगे व त्यांचा पहारा
१) महाद्वाराचा खळगा २) टकमकीचा खळगा ३) टकमक पहारा
४) निवडुंगाचा खळगा ५) सातविणीचा खळगा ६) माडाचा खळगा
७) काळया हौदाचा खळगा ८) लिंगाण्याचा पहारा ९) भवानीचा खळगा
१०) वाघदऱ्याचा पहारा ११) बाराटाकीचा खळगा १२) कोंडेख्रळीचा खळगा
१३) काळकाईचा खळगा १४) हिरकणीचा पहारा
अ) या व्यतिरिक्त इतरस्त्र पहारा -
१५) चौकी फडाची १६) चित्ते दरवाजा १७) धोंडीचा पहारा १८) वाघदऱ्याखालील पहारा
१९) धारबीडचा पहारा २०) कळकीचा पहारा २१) खुबलढा बुरुज २२) लहाना दरवाजा
२३) उंबराची सदर २४) नाडालीचा पहारा २५) तळाचा पहारा २६) टोकाचा पहारा
२७) माथ्यावरील सदरेचा पहारा २८) बाराटाकीचा पहारा २९) धामणदऱ्याचा पहारा
३०) नांदगिरीचा पहारा ३१) केळीचा पहारा ३२) तटबंदी हिरकणीची सदर
३३) लिंगाचा पहारा ३४) गोलंदाजाचा पहारा ३५) चिलखताचा पहारा
५) रायगडाच्या घेऱ्यातील मेटे -
१) कोठिनजीकचे मेट २) म्हशाचे मेट ३) चोखडीचे मेट ४) चाहुटीचे मेट
५) जांभळीचे मेट ६) निसणीचे मेट ७) सावताचे मेट ८) आंब्याचे मेट
९) तोफेचे मेट १०) डयूब्याचे मेट
६) रायगडाच्या घेऱ्यातील गावे -
१) मौजे वाळूसरे २) वाघोली ३) वाडी ४) वाघेरी ५) वारंगी ६) छत्री निजामपूर
७) बावले ८) सांदोशी ९) आमडोशी १०) कावले ११) करमर १२) खलई
१३) पुनाडे १४) सारवट १५) नेराव १६) पाचाड १७) कोंझर १८) मांगरुण
१९) देवघर २०) नाते
७) रायगडावरील तोफांची नावे -
१) तोफ गंगासागर २) तोफ मुलना ३) तोफ पेरूजंगी ४) तोफ भुजंग ५) तोफ रामचंगी
६) तोफ पद्मीण ७) तोफ फतेलष्कर ८) तोफ फतेजं ग ९) तोफ सुंदर १०) तोफ रेकम
११) तोफ मुंगसी १२) तोफ शिवप्रसाद १३) तोफ गणेश १४) तोफ लांडा कसाब
१५) तोफ चांदणी १६) तोफ भवानी १७) तोफ नागीण
८) रायगडाचे अठरा कारखाने (कंसातील प्रतिशब्द राज्यव्यवहार कोशांतील आहेत)
१) खजीना (कोशागारं खजाना स्यात्) २) जव्हाहीरखाना (रत्नशाला)
३) आंबारखाना (धान्यकोश) ४) आबादारखाना (जलस्थान)
५) नगारखाना (नौबतखाना) ६) तालीमखाना (व्यायामशाला)
७) जमादारखाना (वसनागर ८) जिरातेखाना (शास्त्रगार)
९) मुदबखखाना (पाकालय) १०) शरबतखाना (पानकादिरसस्थानं)
११) शिकारखाना (पक्षिशाला) १२) शहतखाना (आरोग्यगृह)
१३) पीलखाना (हत्तीशाला) १४) फरासखाना (राहुटया, डेरे, पाल वगेैरे ठेवण्याची जागा)
१५) उष्टरखाना (उंटशाला) १६) तोफखाना
१७) दफ्तरखाना (लेखशाला) १८) दारुखाना (अग्नस्त्रगृह)
इत्यादी मात्र महाराजांच्या कारखान्यांपैकी दारुखाना हा मोगलांच्या अठरा कारखान्यांपैकी नसून पोर्तुगीज ‘Cada De Palbora’ याच्या धर्तीवर काढला होता.
९) रायगडाचे बारा महाल -
१) पोते (कोषागार) २) टंकसाळ ३) थट्टी (गोशाला)
४) दरूनी (अंत:पूर) ५) सेरी (तृप्ति समाधान) ६) पागा (अश्वशाला)
७) वहिली (रथशाला) ८) इमारत (बांधकाम) ९) कोठी (धान्यकोठार)
१०) पालखी (शिबिका) ११) सौदागरी (व्यापारी) १२) छबीना (रात्रिरक्षणम्)
१०) राजाभिषेक (पहिला) - ६ जून शनिवार अष्टमदिन पहाटे महाराज सुर्योदयापुर्वी तास सव्वा तास ज्या वेळेला गर्गाचार्याचा मुहुर्त म्हणून संबोधतात त्या वेळेस सिंहासनारोहण विधी झाला. ज्येष्ठ शुध्द १२ शुक्रवार घटी २१ पळे ३४ विष्कंम ३८-४० सी ४२ तीन घटीका रात्र ठरली तेव्हा राजश्री सिवाजी राजे भोसले सिंव्हासनी बैसले - पौरोहीत्य
गागाभट्ट
राजाभिषेक (दुसरा) हा राजाभिषेक कुंभ लग्नावर, आयुष्यमन, योग असताना, अनुराधा नक्षत्र बुधवार, आश्विन शु॥ ५, आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी झाला. - पौरोहित्य निश्चलपुरी.
११) राजाभिषेकासमयीचे अष्टप्रधान मंडळ (कंसातील प्रतिशब्द राजाभिषेकापुर्वीचे फार्सी शब्द आहेत)
सिंहासनाच्या डावीकडे -
१) हंबीरराव मोहिते - सेनापती (सर-ए-नौबत)
२) रामचंद्र त्रिंबक - सुमंत (दबीर)
३) निराजी रावजी - न्यायाधीश (काजी-उल-कुजात)
४) मोरेश्वर रघुनाथ - पंडितराव उर्फ दनाध्यक्ष - (सद्र - मुहतसिब)
सिंहासनाच्या उजवीकडे -
१) मोरोपंत पिंगळे - पंतप्रधान (पेशवा)
२) रामचंद्र निळकंठ - अमात्य (मजमुअदार)
३) अण्णाजी दत्तो - सचिव (शुरु - नवीस)
४) दत्ताजी त्रिबंक - मंत्री (वाकिया - नवीस)
१२) महाराजांच्या महानिर्याणानंतर संभाजी राजांनी रायगड आपल्या ताब्यात घेतला तेव्हा अधिकाऱ्यांकडून मागवलेली व स्वत:जातीने तपासणी केलेली रायगडाच्या कुल साहित्याच्या वैभवाची बितपसील यादी -
सोने ९ खंडी, होन ५ लक्ष, तांबे ३ खंडी, शिसे ४५० खंडी, लोखंड २० खंडी,
जस्त व शिसे यांची मिश्र धातू ४०० खंडी, चांदी ५॥ खंडी, ब्राँझ २७२ खंडी,
निरनिराळया अधिकाऱ्यांकडे ३ लक्ष होन, निरनिराळया गडांवर ३० लक्ष होन,
भात १७ हजार खंडी, तेल ७० हजार खंडी, सौंधव २७० खंडी, जिरे २०० खंडी,
गोपीचंदन २०० खंडी , गंधक २०० खंडी, कापडाची ४ हजार पांढरी ठाणे,
हलक्या कापडाचे ३ हजार ठाणे, बुऱ्हाणपुरी कापडाचे १ हजार ठाणे,
पैठणी कापडाचे ४ हजार ठाणी, धान्य, डाळी, तंबाखू साखर मोठया प्रमाणात होत्या,
नऊ कोट रुपयांची सोन्याची नाणी, ५१ हजार तोळे सोने, २०० तोळे माणके,
१ हजार तोळे मोत्ये, ५०० तोळे हिरे, ४० हजार डर्कस, ३० हजार तलवारी,
४० हजार भाले, ६० हजार लाँगडर्कस, ५० हजार दुधारी तलवारी,
६० हजार ढाली, ४० हजार धनुष्य, १८ लक्ष बाण
इत्यादी संपत्ती त्यावेळी रायगडावर होती.
१३) महाराजांशी व रायगडाशी परिचित परकीय प्रवासी -
हेन्री ऑक्झेंड्न हा इंग्रजांचा वकिल सुरतेच्या प्रसिडेंट जॉर्ज ऑक्झेंडनचा नातलग कारवारच्या वखारीचा प्रमुख होता. महाराजांनी कारवार जिंकले तेव्हांचा हा परिचय हाच हेन्री ऑक्झेंडन रायगडावर राज्याभिषेकाच्यावेळी हजर होता. त्याच्या बरोबर जॉर्ज रॉबिन्सन, थॉमस मिचेल, आणि नारायण शेणवी हा दुभाषा आले होते. पुढे सन १६७५ मध्ये सॅम्युअल ऑस्टीन हा वकिल महाराजांच्या दरबारी आढळतो. सन १६७६ मध्ये मौलवेअरने रायगडास इंग्रजांतर्फे वकिली करण्यास भेट दिली. संभाजी राजांच्या आमदानीत कॅप्टन गेरी व लेफ्टनंट विल्किन्स आणि नंतर बहूधा केग्विन याने रायगडाला भेट दिली. केनेडी, डग्लस, मेजर हॉल, कर्नल प्रॉथर, लेफ्टनंट क्रॉसबी, लेफ्टनंट रेमन, एन्साइन्स जॅप, डॅशवूड, मेजर बाँन्ड या इंग्रजांनी रायगडास भेटी दिल्याचा उल्लेख आढळतो, हेन्री रेव्ंहिगटन तर शिवकालात कैदी म्हणून वास्तव्यास होता. पोर्तुगीज वकिल गोंझालो मार्टिन आणि डच वकिल अब्राहम लेपेकर यांच्या रायगडवारी बद्दल माहिती उपलब्ध असून मुंबईचे गव्हर्नर सर रिचर्ड टेंपल, रेव्हेन्यू, कमिशनर क्रॉफर्ड कॅप्टन पिट, जेम्स डग्लस या मंडळीच्या भेटी तर उल्लेखनीय आहेत.
१४) रायगड शकावली -
११ वे शतक - यादवांची सत्ता गडावर मराठे पाळेगार.
१२ वे शतक - मराठे पाळेगारांनी विजयनगर अथवा. अनागोंदीचे स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४३६ - अल्लाउद्दीन शहा बहामनी २रा याचे मराठे पाळेगारांनी स्वामित्व स्विकारले.
इ.स. १४७९ - अहमद नगरच्या निजामशहाकडे गड ताब्यात शिर्के येथील देशमुख.
इ.स. १५५८ - अदिलशहाची अधिसत्ता.
इ.स. १६१७ - निजामशाही अधिकारी म्हणून आागा हाजी याकुद इस्तंबोली हा हवालदार.
इ.स. १६१८ - आदिलशाहीच्यावतीने हैबतखानाचा रायरीवर हल्ला, लुट व सबंध खोरे काबीज, हवालदारी राजे पतंगराव याजकडे.
इ.स. १६२१ - राजे पतंगराव यांची बदली होवुन मलिक जमरुत गडाचा हवालदार.
इ.स. १६२४ - निजामशाही अधिकारी म्हणून इब्राहिमखान हा रायरीचा व बारा मावळांचा हवालदार.
६ मे १६३६ - बादशहा शहाजहान याची निजामशाहीवर स्वारी व विजय, मोगल राजधानी पासून दुर असलेला हा अवघड मुलूख सांभाळणे कठीण म्हणून अदिल शहाशी तह. रायरीचा प्रत्यक्ष ताबा चंद्रराव मोऱ्यांकडे.
६ मे १६५६ - शिवरायांनी रायरी जिंकला.
४ सप्टेंबर १६५६ - रायरी हे नांव बदलू रायगड हे नामकरण.
इ.स. १६५७-५८ - आबाजी सोनदेव व रामराव प्रभू यांची नेमणूक
११ डिसेंबर १६६७ - पोर्तुगीज वकील गोंझालो मार्टिनशी वाटाघाटी.
इ.स. १६७० - गडाची दुरुस्ती, व नवीन बांधकाम महाराजांचे कायमस्वरुपी वास्तव्य.
मे १६७२ - इंग्रज वकील उस्टिक रायगडावर.
२१ जुलै १६७२ - डच वकील आब्राहम लेपेकर रायगडावर.
३ जून १६७३ - इंग्रज वकील थॉमस निकल्स रायगडावर.
२२ मे १६७४ - हेन्री ऑक्झेंडनचे आगमन व १३ जुन पर्यंत मुक्काम
२९ मे १६७४ - महाराजांची समंत्रक मुंज.
३० मे १६७४ - सोयराबाई साहेबांशी समंत्रक विवाह.
६ जून १६७४ - जेष्ठ शु. १३ शिवराज्याभिषेक.
१७ जून १६७४ - राजमाता जिजाऊसाहेबांचे पाचाड येथे निधन.
२४ सप्टेंबर १६७४ - अश्विन शु. ५ (ललितापचंमी) दुसरा राज्याभिषेक
२४ सप्टेंबर १६७५ - इंग्रजवकील सॅम्युअल ऑस्टिन गडावर.
७ सप्टेंबर १६७५ - राजाराम साहेबांची मुंज.
१५ मार्च १६८० - राजाराम साहेबांचे लग्न.
३ एप्रिल १६८० - महाराजांचे महाप्रस्थान.
२१ एप्रिल १६८० - राजाराम साहेबांचे मंचकारोहण.
१८ जून १६८० - संभाजी राजांचे पन्हाळयाहून आगमन.
२७ जून १६८० - शिवपत्नी पुतळाबाई साहेब सती.
२० जुलै १६८० - संभाजी राजांचे मंचकारोहण.
२७ ऑक्टोबर १६८० - मोरोपंत पिंगळे यांचे देहावसन.
१६ फेब्रुवारी १६८१ - संभाजी राजांचा विधियुक्त राज्याभिषेक.
ऑगस्ट १६८१ - संभाजी राजांवर विषप्रयोगाचा प्रयत्न.
९ फेब्रुवारी १६८१ - राजाराम महाराजांचे मंचकारोहण.
२५ मार्च १६८९ - झुल्फिकार खानाचा रायगडाला वेढा.
५ एप्रिल १६८९ - राजाराम महाराज रायगडावरुन निसटले.
३ नोव्हेंबर १६८९ - गड मोगल्यांच्या हाती - इस्लामाबाद नामकरण.
इ.स. १६९० - मोगलांतर्फे गडाचा ताबा सिद्दीकडे.
६ जून १७३३ - रायगड पेशव्यांनी घेतला, ताबा पंतप्रतिनिधींकडे.
१८ मार्च १७७३ - रायगड पेशव्यांच्या ताब्यात.
जून १७९६ - नाना फडणविसांचा मुक्काम व गडाची डागडुजी.
इ.स. १८०२ - दुसऱ्या बाजीरावाचे गडावर वास्तव्य.
२ फेब्रुवारी १८१० - रायगड-माची येथे दुसऱ्या बाजीरावाचा मुक्काम.
इ.स. १८१६ - रायगड इंग्रजांकडे परंतु लगेच त्याचा ताबा पेशव्यांकडे, पेशवे गड सोडिनाच.
२५ एप्रिल १८१८ - इंग्रजांचा रायगडाला वेढा.
४ मे १८१८ - खुब लढयावर इंग्रजांचा भडिमार.
६ मे १८१८ - पोटल्याच्या डोंगराकडून केलेल्या भडिमाराने गडावर जाळपोळ.
१० मे १८१८ - रायगडावरील स्वातंत्र्यसुर्य मावळला तह होवुन गड इंग्रजांकडे. संग्रहित माहिती...
ADhiRAJ Lokedhirajloke.blogspot.com
www.facebook.com/dhiraj.loketwitter.com/dhiraj100loke
dhirajloke.webs.comhttps://profiles.google.com/110331284163797351089

No comments:
Post a Comment