Popular Posts

Tuesday, June 26, 2012

"अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".




मित्रानो दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित "मानगड" च्या यशस्वी आणि अविस्मरनीय "श्रमदान व गडदर्शन मोहिमे" नंतर आता दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे "अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".. दि. ८ जुलै २०१२ रोजी आपण सुद्धा सहभागी व्हा...
संपर्क:-
संतोष हसुरकर :- ९८३३४५८१५१ (मुंबई ) Santosh Hasurkar
नितिन पाटोळे :- ८६५५८२३७४८ (मुंबई ) Nitin Patole
अजित राणे :- ९७६८३८९१८९ (मुंबई) Ajit Rane
प्रीति घुले:- ८२९१८६२१३५ (मुंबई)
शैलेश कंधारे :- ९९२३४९३५०६ (पुणे) Shailesh Kandhare
जय शिवराय
दुर्गवीर प्रतिष्ठान
http://www.durgveer.com/
https://www.facebook.com/groups/durgaveer/
https://www.facebook.com/DurgaveerPratisthan
 

1 comment:

Unknown said...

दिनांक २५ मार्च २०१२
*अवचितगड दुर्गभ्रमंती*
दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते.
घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. याच दरवाज्या समोर एका कोपर्यात शिलालेख ,,,आहे त्या शिलालेखात अवचितगडाचा इतिहास असावा ....गडावर महादेवाचे सुंदर मानादीर आहे ..त्याच मंदिरा समोर ...लोहगडाच्या हत्ती तलावासारखा बारा कोणी......तलाव आहे .... दुसर्‍या दरवाजात पाण्याने तुडुंब भरलेला तलाव आहे. कुंडातील पाणी एकदम पिण्यायोग्य आहे. जवळच खंडोबाची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे.पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. इथल्या रानात रानडुकरे,माकड,बिबळ्या,कोल्हे इ. प्राणी आढळतात. गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती ,सुधागड,सरसगड,धनगड,कोरीगड,रायगड,सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो.................