Popular Posts

Tuesday, June 19, 2012

मानगड श्रमदान मोहीम दिनांक १७/६/२०१२


मानगड श्रमदान मोहीम
दुर्गवीर प्रतिष्ठान च्या वतीने राबविण्यातआलले दुर्ग संवर्धन मोहिमे अंतर्गत "किल्ले मानगड" वरील मुख्य प्रवेशदरवाजातील मांडणी आणि एका जुन्या दरवाजातील उत्खनन श्रमदान राबविण्यात आलेले आहे.
त्याच साफ - सफाई न करण्यात आल्याने "किल्ले मानगड'' ठिकठिकाणी अस्वच्छता झाली होती. ती सुद्धा दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी साफ सफाई करण्यात आली. मुख्य म्हणजे मानगडाच्या शेवटच्या बुरुजावरील २५० ते ३०० वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा उत्खनन करून तो संपूर्णपणे ६ ते ७ शिवकाळातील पायऱ्या दिसतील अश्या अवस्थेत ते श्रमदान करण्यात आले.
त्या दरवाजावरील मातीचा ढिगारा आणि दगड काढण्यात आले. या पुढे त्या गडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांना त्या शिवकाळातील तो दरवाजा आता संपूर्णपणे बघू शकतो अश्या पद्धतीने श्रमदान करण्यात आले.
 —

No comments: