Popular Posts

Saturday, June 23, 2012

मानाचा गड... मानगड



शब्दांकन नितिन पाटोळे  

"किल्ले मानगड" श्रमदान मोहीम 


दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित किल्ले मानगड श्रमदान मोहीम 

किल्ले रायगड हा भारतीय इतिहासातील मानबिंदू. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेचा मानबिंदू. हा किल्ला माहित नाही असा मराठी माणूस सापडणार नाही. पण, ज्या प्रमाणे राजाला अंगरक्षक असतात त्या प्रमाणे हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याला सात अंगरक्षक आहेत. या परिसराला 'प्रभावळी' असे म्हटले जाते. त्यातीलच एक संरक्षक किल्ला आहे किल्ले मानगड! 

महाराष्ट्रातील अनेक उपेक्षित किल्ल्यान पैकी एक. दुर्लक्षित. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या वतीने या किल्ले रायगडच्या पहारेकऱ्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्थानिक गावातील सरपंच व गावकऱ्याच्या मदतीने किल्ल्या वरील मुख्य प्रवेशदरवाजातील मांडणी आणि एका जुन्या दरवाजातील उत्खनन श्रमदान राबविण्यात आलेले आहे..... 

मानाचा गड म्हणून या किल्ल्याला मानगड असा उल्लेख होतो .. ... 

गडावर ठिकठिकाणी अस्वच्छता झाली होती. ती सुद्धा दुर्गवीरच्या कार्यकर्त्यांनी साफ सफाई करण्यात आली. 
मुख्य म्हणजे मानगडाच्या शेवटच्या बुरुजावरील एक भला मोठाला विशिष्ट आकाराचा दगड पाहून संतोष (प्रमुख) ने आपल्या श्रमदानाच्या अनुभवावरून व ऐतिहासिक अभ्य्सानुसार त्या तिथे नक्कीच काही असणार याचा निष्कर्ष लावला ,ठरल्या प्रमाणे संतोष ने char प्रकारात विभागणी केली .. 

ती अशी 
१) महादरवाजा 
२) शेवटचा बुरुज 
३) शालेय वस्तूचे वाटप 
४) माहिती फलक 

पुण्याहून आलेले आमचे थोरले बंधू शैलेश कंदारे व त्यांच्या सहकार्यांनी महादरवाजा जी जबाबदारी घेतली ........ 

महिला मंडळ शालेय वस्तूंचे वाटप करण्यास सज्ज झाले .............
तशी आमची गीतू ताई आमच्या सोबतच होती ...... 
मी मात्र माझ्या (दुर्गविर) बंधू सोबत बुरजावर गेलो........... 
मग काय श्रमदान सुरु पावसाच्या आगमनाने या वेळची मोहीम अविस्मरणीय झाली .. 

या श्रमदानात २५० ते ३०० वर्षापूर्वीचा दरवाजा सुद्धा उत्खनन करून तो संपूर्णपणे ६ ते ७ शिवकाळातील पायऱ्या दिसतील अश्या प्रकारचे श्रमदान करण्यात आले.त्या दरवाजावरील मातीचा ढिगारा आणि दगड काढण्यात आले. या पुढे त्या गडाला भेट देणाऱ्या शिवभक्तांना त्या शिवकाळातील तो दरवाजा आता संपूर्णपणे बघू शकतो अश्या पद्धतीने श्रमदान करण्यात आले... 

या मोहिमेला मुंबई व ठाणे परिसरातील अनेक शिवप्रेमी व दुर्गप्रेमींनी उत्तम प्रतिसाद दिला असून, श्रमदान करून आपली उज्ज्वल संस्कृती असलेल्या गड किल्ल्याच्या संवर्धनात मोलाची कामगिरी बजावली आहे. 

मुख्य म्हणजे ६ तरुणी आणि ३६ तरुण असा दुर्गवीर परिवारातील मावळ्यांनी हे श्रमदानाचे संयोजन राबविण्यात आले. गडाच्या पायथ्याशी असलेले माशिदवाडी उर्फ (मानवाडी) येथील ग्रामस्थ रामजी कदम यांनी सुद्धा दुर्गवीरच्या सर्व मावळ्यांना आपल्या परिवारातील एक घटक समजून जी मदत केली ती त्या मदतीला शब्द सुद्धा कमी पडतील असे आहे......... 

या अश्या शिवकार्यात आपल्यालाही सहभाग घेयचा असेन तर नक्कीच कळवा....... 
आपलाच मित्र नितीन पाटोळे शब्दांकन नितिन पाटोळे 

जय जिजाऊ l
जय शिवराय ll
जय शंभूराय ll

No comments: