Popular Posts

Thursday, June 28, 2012

शिवदुर्ग "अवचीतगड" श्रमदान मोहीम दि. ८ जुलै २०१२ (Avachitgad Shramdan Mohim Dated 8th July 2012 )




दुर्गविर प्रतिष्ठान तर्फे आयोजीत शिवदुर्ग "अवचीतगड" श्रमदान मोहीम(Avachitgad Shramdan Mohim )

जय शिवराय
मित्रानो दुर्गवीर प्रतिष्ठान आयोजित "मानगड" च्या यशस्वी आणि अविस्मरनीय "श्रमदान मोहिमे" नंतर आता दुर्गवीर प्रतिष्ठान तर्फे "अवचितगड" "गडदर्शन व श्रमदान मोहिम".. दि. ८ जुलै २०१२ रोजी आयोजित करण्यात येत आहे आपण सुद्धा या शिव्कार्यात सहभागी व्हा...

दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. महाराष्ट्रातील मोजक्या पण श्रीमंत गडांमध्ये या गडाची गणना होते.
घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग दुर्गम झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला असल्याने हा किल्ला संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता.

गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. याच दरवाज्या समोर एका कोपर्यात शिलालेख ,,,आहे त्या शिलालेखात अवचितगडाचा इतिहास असावा ....गडावर महादेवाचे सुंदर मानादीर आहे ..त्याच मंदिरा समोर ...लोहगडाच्या हत्ती तलावासारखा बारा कोणी......तलाव आहे .... दुसर्‍या दरवाजात पाण्याने तुडुंब भरलेला तलाव आहे.टाळावा जवळच बाजी पासलकर यांची पाषाणातील मूर्ती आहे.पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते...
दुर्गविर तर्फे मागील महिन्यात महाराष्ट्र दिन याच गडावर करण्यात आला होता .
गडावरून समोरच तैलबैलाच्या दोन प्रस्तरभिंती ,सुधागड,सरसगड,धनगड,कोरीगड,रायगड,सवाष्णीचा घाट इत्यादी परिसर न्याहाळता येतो


कोणी किती किल्ले पाहिले हे महत्वाचे नसून ,,त्या गड्कील्यांसाठी आपण काय केले हे महत्वाचे ,दुर्गवीर प्रतिष्ठानाचे प्रत्येक मावळा ''श्रमदान हेच शिवकार्य '' हा मंत्र मनात ठेऊन शिवकार्य करत असत..............
श्रमदान फक्त राजांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या गड्कील्ल्यांसाठी........
श्रमदान फक्त इतिहासाची जान करून देण्यासाठी............................
श्रमदान फक्त येणाऱ्या असंख्य पीडिला आपले राजे काय होते हे समजण्यासाठी...........
श्रमदान फक्त शंभूराजांच्या बलिदानाची जान असण्यासाठी.................
आम्हा दुर्गवीराना अनेक शिवप्रेमी विचारणी करतात कि..
तुह्मी हे श्रमदान का व कशासाठी करतात...... ??
त्यांचे उत्तर या शिवकार्यतून दिसून येईलच.....
तरी हि सांगतो .......
ज्यांच्या जोरावर शिवरायानी , स्वराजांचे देखणे स्वप्न साकार केले, ते हेच गडकोट आज किती
भग्नंअवस्थेत आहेत......
त्याच गडकोटांचे अस्थित्व टिकविण्यासाठी हे श्रमदान.......

या या शिवरायाच्या मावळ्यानो सामील व्हा ......................
या शिवकार्यात..

करून तर पहा हे शिवकार्या ,काय आनद मिळतो ते...
या हे गडकोट आवाज देत आहे.....''''जागे करा पुन्हा आम्हाला''''' मग येणार का ........
फक्त एक दिवस या गडकोटांच्या अस्थित्वासाठी
या पुढे देखील हे शिवकार्य अजून जोमाने करू....तुम्हा सर्व मावळ्यांचा सहकार्याने हा इतिहास ज्वलंत आणि जिवंत ठेऊ आणि स्वराज्याच्या गड-बुरुजाला मुला सकट जागे करू व त्यांना आधार देऊ...
त्यातून मिळणारे समाधान...
हाच कदाचित राजांना मानाचा मुजरा असेल.
स्वराज्याच्या गडकिल्याबद्दलची निष्ठा आणि तुमचा या शिवकार्याला लागलेला हातभार ....
हेच आमचे पाठबळ.

तुम्हाला या शिवकार्या सहभाग घेयावायचा असेल तर नक्की संपर्क करा....

संतोष असुरकर (मुंबई)
9833458151
नितीन पाटोळे (मुंबई)
08655823748
अजित राणे (मुंबई)
09768389189
प्रीति घुले:- 8291862135 (मुंबई)
शैलेश कंधारे :-9923493506 (पुणे)
जय शिवराय...!!

मुंबई वरून येणर्या शिवभक्तानी ....दि ७/७/१२/ ला दिवा रेल्वे स्टेशन जवळ ६.१५ पर्यंत पोहचावे....
आपण सर्वे रात्री १०.३० पर्यंत अवचितगडाच्या पायथ्याशी पोहचू .......
निढी गावातील विठ्ठलाच्या मंदिरात आपल्या राहण्यची सोय केलेली आहे
रात्र भर आराम करून पाहते ७ पर्यंत गड सरकरायला सुरवात करू .....
श्रमदान व गडफेरी झाल्यावर दुपारी २.०० गड उतरण्यास सुरवात करू........

NOTE ....
१ दिलेल्या वेळेत दिवा रेल्वे स्थानका जवळ भेटावे....
३ सकाळचा नाश्ता , चहा , दुपारचे जेवण,आणि दुपारचा चहा व नाश्ता दुर्गविर तर्फे
देण्यात येईल
४ प्रवेश शुल्क....२००/..200rs ......
५ अधिक माहितीसाठी संपर्क करा

अजित राणे ९७६८३८९१८९ ,
नितीन पाटोळे ८६५५८२३७४८

................,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,सर्व अधिकार दुर्गविर प्रतिष्ठान ...........................

No comments: