Popular Posts

Saturday, October 8, 2011


म्हणून मी आता नविन सुरवात करणार !

म्हणून मी आता नविन सुरवात करणार

तू माझा एक सुंदर स्वप्न होतीस
पण, ते तर फार भयानक निघाल
नुसत्या आठवणीवर आयुष्य नाही सरत
बरझाल खूप लवकर मला कळाल
म्हणून मी आता नविन सुरवात करणार !

मी चुकीचा होतो कि, तू बरोबर
याच ऊतर आपल्या दोघांकडेही नसाव
कारण दोघांमधल्या कोणत्याही विषयाचा शेवट
भांडणामध्ये रुपांतर होऊन गप्प बसाव
म्हणून मी आता नविन सुरवात करणार !

अस काहीच उरल नव्हत आपल्यात
मग, ऊगाचच का नात टिकवण्याचा अट्टहास
तुझ्या जीवघेण्या वागण्याचा खरच
मला खूप व्हायचा बघ त्रास
म्हणून मी आता नविन सुरवात करणार !

मी कितेकदा तुझ्याशी खोट बोललो
अण, तू हि माझ्यापासून बराच काही लपवलस
तुझ्या सहवासात मी प्रेमाचा क्षण शोधला
पण, तो नेहमीच संशयाच बोट धरलस
म्हणून मी आता नविन सुरवात करणार !

तुला झेलणं फारच अवघड होत
तुझ्या वागण्यातून मला कळत होत
तू तर मला केव्हाच विसरलीस
याच उदाहरण मी या डोळ्यांनी पाहिलं होते
म्हणून मी आता नविन सुरवात करणार
Collection By............
ADhiRAJ Loke

No comments: