Popular Posts

Saturday, May 14, 2011

अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

आपल्या पहिल्या बाळाची चाहूल आईपेक्ष्या
बाबांना फार कासावीस करायची
पण हे जग बघतांना फक्त आईकडेच पहात हसून
बाबांकडे किलकिले डोळे करत 'आईच" हाक मारायचं
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

आपल्या मुलांच्या सुखी भविष्याचे स्वप्नं
त्यांचे लाड पालन पोषण बाबांनी करायचं
पण नेहमीच गुणगान प्रेम आईवर करायचं
अन बाबांना मात्र नेहमीच प्रेमातून वजा करायचं
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

सकाळी बाबांनी घरातून कामासाठी बाहेर पडल्यावर
घरांत आई आणि मुलांचे राज्य असते
कसे आहेत ? जेवले की नाही ?
साधा फोन किवा sms करून नाही विचारायचं?
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

सकाळी डब्बा असेल नसेल कोणाला तमा नाही
कॅन्टीन मध्ये अघळपघळ खाउन वेळ मारायची
अन संध्याकाळी थकून घरी आल्यावर मात्र
हिटलर घरी आल्यासारखे पाहून गुपचूप बसायचं
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

बाबा घरी आले की जणू घरांत
स्मशानवंत शांतात असते
बाबांना जरा पाणी विचारून चहा देवून
आज काम जास्त होते का ? म्हणून प्रेमाने तरी विचारायचं ?
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

पगार जवळ आला की बायको नावाचा भुंगा
लगेच अवती भवती गुणगुणायला लागतो
मग घरच्यांच्या भल्या मोठ्या मागण्यांची लिस्ट
पुरी करता गरीब बिचारा बाबा नावाच्या प्राण्याने बेजार व्हायचं
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

कित्येक वेळा आजारी असताना पण बाबा कामावर जातांत
overtime ज्यादा काम करून राब राब राबतात
बाबांच्या आवडीचे खाणे करायला सांगितले तर ह्यांना वेळ नसतो
फक्त टीवी सीरिअल पाहणं तासंतास फोन वर बोलायचं
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

रविवारी सकाळी सकाळी लवकर उठवून हातांत भाजीची पिशवी देवून
गाढवासारखे बाबांना मार्केटला पिटाळले जाते
अन काही मनासारखी कांदाभजी कर
अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

बाबांनी फक्त ह्यांच्या हौस मौस लाड चोचले इच्छा आकांक्षा
पूर्ण करण्यासाठी केस पांढरे होई पर्यंत झटायचे
पण कधी बाबांच्या डोळ्यांत कधी पाहिलं का ?
त्यांना छोट्या छोट्या गोष्टीत सुख कोणी द्यायचं ?

अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

कधी डोकं चेपायला सांगितले तर आई मुलीने
हाताला मेहंदी लावलेली असते
"" गोळी घेवून गप्पं पडा !! कट कट करू नका !!"
असे ऐकून अंगावर पांघरून घेवून गुपचूप पडायचं

अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

बाबांनी कधी रागावले तर बाबाला खडूस
तापट म्हणून शेरा मारला जातो
पण आईने किती चोपले तरी आईचा
मऊ फुलासारखा हात मुलांना कधीच लागत नसतो

अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

आईच्या मुलांच्या आजारपणांत बाबा
कित्येक रात्र बाबा झोपत सुद्धा नाहीत
हळूच कोपऱ्यांत डोळ्यांतले अश्रू पुसंत
चेहऱ्यावर हास्य आणणारे बाबा कोणालाच कळत नाही

अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

मुलीच्या फक्त सासरी जाण्याच्या कल्पनेने
बाबांचे मन आतून रडायला लागते
मुलीच्या सुखी आयुष्यासाठी
त्यांचे मन नेहमीच धडपडत असते

अन बाबांचं हळवं मन कोणाला कसं कळायचं?

वरून दगडासारखा कठीण आणि आतून
शाडूच्या मातीसारखं मऊ मुलायम मन
कधीच का कोणाला दिसत नाही
मायेच्या झुल्यांत बाबांना पण जागा का मिळत नाही ?

No comments: